Skip to main content

Posts

Featured

एक खटाटोप मधोत्पादन वाढवण्यासाठीचा :- पैसे कमावण्यासाठी निसर्गात नाक खुपसून ढवळाढवळ करण्याची मानवाची वृत्ती काही नवीन नाही. पण असे खटाटोप मानवाच्याच कसे अंगलट येतात त्याची ही गोष्ट. ब्राझील देशाच्या सरकारचे एक जुने महात्वाकांक्षी स्वप्न होते. ब्राझीलला जगातील सर्वात जास्त मधोत्पादन करणारा देश बनवायचे. ब्राझील चे जनुकीय तज्ञ डॉ . वोर्र्वीक कर्र यांना आपण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकू असा वि श्वास होता. मधमाश्यांच्या काही आफ्रिकन प्रजाती इतर प्रजातींपेक्षा खूप जास्त प्रमाणात मध निर्मिती करतात हे त्यांना माहित होते. त्यासाठी त्यांनी मध्य- दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया या देशात अभ्यास सफर काढली. आफ्रिकेतील अनेक मधमाश्यांचा अभ्यास करून त्यांनी सर्वात जास्त मध निर्माण करणारी एक प्रजात प्रयोगासाठी निवडली. ब्राझील सरकाने डॉ वोर्र्वीक यांना प्रयोगासाठी आफ्रिकेतून राणीमाश्या ब्राझील मध्ये आणायची परवानगी दिली मात्र त्या राणी माश्या पळून जाणार नाहीत याची जबाबदारीही त्यांच्या वर टाकली. दरम्यान डॉ वोर्र्वीक यांना या आफ्रिकन प्रजाती बद्दल एक अजब गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे त्यांची अतिश

Latest posts